राजस्थान मधील अलवार जिल्ह्यात पुन्हा एकदा कथित गोराक्षांनी एका तरुणाची हत्या केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री काही लोकांनी गोधन घेवून जाण्याऱ्या दोघांना गोतस्करी च्या संशयावरून जोरदार मारहाण केली आहे. त्यातील एक तरुण उमर मोहम्मदचा मृत्यू झाला आहे. आणि त्याचा साथीदार ताहीर गंभीर जखमी आहे. याआधी एप्रिलमध्ये अलवर येथेच एक डेअरी व्यापारी पहलु खान चा मृत्यू झाला होता. हि घटना शनिवारी रात्री हरियाना-राजस्थान सीमेवर घडली. उमर आणि ताहीर पिकअप ट्रक मध्ये हरियानाच्या मेवात इथून गायी घेवून भरतपूर जात होते. वाटेत काही लोकांच्या घोड्क्याने त्यांना अडवले आणि जोरदार मारहाण केली. प्राथमिक तपासावरून असे आढळून आले कि उमर ला गोळी मारण्यात आली आहे ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews